India Alliance News: इंडिया आघाडीची ताकद वाढली, आणखी दोन पक्ष झाले सहभागी

India Alliance Meeting in Mumbai: इंडिया आघाडीची मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी देशभरातील विरोधी पक्षाचे ६३ नेते उपस्थित राहणार आहे. याआधी इंडिया आघाडीच्या दोन बैठक पार पडल्या आहे.

ज्यात २६ पक्ष सहभागी झाले होते. मात्र आता इंडिया आघाडीत आणखी दोन पक्ष सहभागी झाले आहेत, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. इंडिया आघाडीच्या तिसऱ्या बैठकी आधी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली आहे. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, जयंत पाटील आणि इतर महत्वाचे नेते सहभागी झाले होते.

पत्रकार परिषदेत बोलताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, पहिल्या बैठकीत २६ पक्ष होते. आज २८ पक्ष आघाडीत आले आहेत. ते म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत आघाडीत जे पक्ष होते, त्यांना २३ कोटी ४० लाख मत मिळाले होते. 

Dahi Handi 2023 : राज्यातील गोविंदांना सरकारकडून मोठं गिफ्ट, विम्यासाठी १८ लाख ७५ हजारांची रक्कम मंजूर

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''भाजपने सांगितले मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घ्या. मी म्हटलं होतं बिल्किस बानोकडून राखी बांधून घ्या.'' ते म्हणाले, गॅस सिलिंडरची किंमत कमी झाली. जशी इंडिया आघाडी पुढे जाईल, तसे केंद्र सरकार सिलेंडर मोफत देऊन टाकेल.

यातच शरद पवार म्हणाले की, ''पंतप्रधान यांचं भोपाळ येथील भाषण ऐकलं. त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर भ्रष्टाचार केल्याची टीका केली. त्यांनी राज्य सहकारी बँक सिंचन घोटाळा उल्लेख केला. ते पंतप्रधान आहेत, त्यांनी सखोल चौकशी करावी, सत्य परिस्थिती समोर ठेवावी. नुसते आरोप करून उपयोग नाही.''

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply