INDIA Alliance : इंडिया आघाडीला आणखी एक धक्का! ममतांपाठोपाठ 'आप'नेही साथ सोडली? 'एकला चलो रे'चा नारा

INDIA Alliance : इंडिया आघाडीला पश्चिम बंगालनंतर आता पंजाबमध्ये सुद्धा तडा गेलाय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आमदी पार्टीने पंजाबमध्ये एकला चलो रे ची भूमिका घेतील. पंजाबच्या सर्व १३ लोकसभा जागेवर आप एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात असून त्या संदर्भात तयारी सुद्धा चालू केलीय.

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबमधील होणाऱ्या निवडणुकीत स्वबळावर लढण्याच्या निर्णयाला अरविंद केजरीवाल यांनी परवानगी दिलीय. मुख्यमंत्री  भगवंत मान यांनी अनेकवेळा सार्वजनिक व्यासपीठावरून याचा सुतोवाच केलाय. दम्यान पुढील काही दिवसात याची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. काही दिवसापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष्या ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. पश्चिम बंगालमधील सर्व जागांवर तृणमूल काँग्रेस उमेदवार देणार असून यात कोणाशीच युती करणार नसल्याचं त्यांनी घोषणा केली होती.

Dhule LCB Action : धुळ्यात उधळला नशेचा बाजार; स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

काँग्रेस पक्षासोबत आपली कोणतीच चर्चा झाली नाहीये. पश्चिम बंगालमध्ये आम्ही स्वबळावर एकट्याने निवडणूक लढवणार असल्याचं आम्ही नेहमी सांगितलंय, असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. राष्ट्रीय पातळीवर काय होईल याची चिंता नाही. परंतु आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपला आम्हीच पराभूत करून शकतो. तसेच आम्ही इंडिया आघाडीचा एक भाग आहोत.राहुल गांधींची न्याय यात्रा राज्यातून जाणार आहे. परंतु आम्हाला त्याविषयी कोणतीच सुचना देण्यात आली नाहीये, असंही बॅनर्जी म्हणाले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply