Indapur Politics : 'साहेब म्हणतील तोच आमदार', भाजप, राष्ट्रवादीनंतर शरद पवारांनीही शड्डू ठोकला; इंदापुरात राजकारण तापलं!

Indapur Politics : राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. विधानसभेआधी राज्याचे राजकारण चांगलेच तापले असून महायुतीमधील कुरघोड्या आत्तापासूनच सुरू झाल्या आहेत. इंदापुर तालुक्यात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी तयारीला लागा म्हणत विधानसभेसाठी रणशिंग फुंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनीही हॅट्रिक साधणार म्हणत प्रत्यूत्तर दिले. भाजप, राष्ट्रवादीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही इंदापुरवर विधानसभेवर दावा ठोकला आहे.

२०२४च्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यआधीच इंदापुर तालुक्यात राजकारण तापू लागले आहे. एकीकडे इंदापूरमध्ये विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी हॅट्रिक साधण्याचा निर्धार केला असताना भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही निवडणुकींच्या रिंगणात उतरणार असल्याचा इशारा दिला आहे.

Pune Tourist Places : पुण्यात पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक आदेश लागू! कुठल्या ठिकाणी जमावबंदी काय आहेत नियम? जाणून घ्या

दोन दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी विमान चिन्हाच्या लागा तयारीला असा बॅनर झळकवला होता. तर त्याच्याच शेजारी दुसरा बॅनर लावून आमचं ठरत नसतं, फिक्स असतं म्हणत दत्तात्रय भरणे समर्थकांनीही प्रत्यूत्तर दिले होते. आता भाजप, राष्ट्रवादीनंतर शरद पवार गटाच्या बॅनरनेही सर्वांचे लक्ष वेधले आहे.

"आजपर्यंतचा इतिहास साहेब म्हणतील तोच इंदापूर विधानसभेचा आमदार असा मजकूर असलेला बॅनर झळकावत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडूनही इशारा देण्यात आला आहे. या बॅनरवर शरदचंद्र पवार व सुप्रिया सुळे यांचा फोटो लावण्यात आला आहे. दरम्यान, तिन्ही पक्षांकडून 2024 ला आमचाच पक्षाच्या होणार आमदार अशी भविष्यवाणी वर्तवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply