Indapur Gopichand Padalkar : इंदापुरात गोपीचंद पडळकरांवर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक, उपोषणस्थळी नेमकं काय घडलं?

Indapur Gopichand Padalkar : अण्णा काटे यांच्या उपोषणस्थळी जाताना इंदापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्यावर मराठा आंदोलकांकडून चप्पलफेक करण्यात आली. याठीकाणी साखळी उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांनी, गोपीचंद पडळकरांना आपण येथे का आला आहात, असे विचारत त्यांच्या दिशेने चप्पल फेकल्याची माहिती आहे. तसेच मराठा आंदोलकांनी गो बॅकच्या घोषणाही दिल्या आहेत.

गोपीचंद पडळकरांवरील चप्पलफेकीनंतर धनगर समाज आक्रमक झाला असून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. चप्पलफेक करणं म्हणजे वादाचा प्रकार आहे. दोन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाजाचे नेते शशिकांत तरंगे यांनी दिला आहे.

पुणे जिह्यातील इंदापूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत ओबीसी एल्गार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला भाजप आमदार गोपीचंद पडळकर याच्यासह अनेक ओबीसी नेते हजर होते. या सभेत छगन भुजबळ आणि गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी गोपीचंद पडळकरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; वाहन चालक जागीच ठार, 10 जखमी

दरम्यान इंदापुरमध्ये दोन समाजाचे उपोषण सुरू आहे. अण्णा काटे यांचे उपोषण सुरू असलेल्या ठिकाणी मराठा समाजाचेही साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान आज गोपीचंद पडळकर उपोषणस्थळी भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी साखळी उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांनी, गोपीचंद पडळकरांना आपण येथे का आला आहात, असे विचारत चप्पलफेक केली. त्यामुळे उपोषण ठिकाणी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान मराठा समाजाने चप्पलफेक केल्याचा आरोप फेटाळला असून चप्पलफेक करणारी माणसं पडळकर यांचीच असल्याचा आरोप केला आहे. तर चप्पलफेकीच्या घटनेनंतर धनगर समाजही आक्रमक झाला असून संबंधितांवर कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply