Indapur : उजनी काठी पक्ष्यांचे फिरते संमेलन

Indapur : उजनीचे खास आकर्षण असलेले. रोहित (फ्लेमिंगो) स्थलांतरित पाहुणे परदेशी पक्षी यावर्षी उजनीत उशिरा दाखल झाले होते. मात्र, आता उजनी जलाशयातील पाणी मोठ्या प्रमाणामध्ये घटू लागल्याने उजनी जलाशयाच्या आश्रयाला येणाऱ्या हजारो स्थलांतरित व स्थानिक स्थलांतरित पक्षांना आता मोठ्या प्रमाणामध्ये चराऊ भाग दलदलीची ठिकाणे, पाणथळ थळी निर्माण झाल्याने या पक्ष्यांनी आता उजनी काठच्या गावगावांच्या पाणवठ्याच्या परिसरात पाहुणचार घेण्याचा जणू सपाटा लावला आहे. उजनीकाठी त्यांचे भरलेले आता स्नेहसंमेलन जणू आता भर रंगात आले आहे. सध्या रोहित सह अन्य पक्ष्यांचा मुक्काम पोस्ट पळसदेव येथे असल्याने पळसदेव (काळेवाडी) चा परिसर पक्ष्यांच्या गजबजाटाने व सौंदर्याने खुलून गेला आहे.

पाचशेहून अधिक संख्येतील फ्लेमिंगो पळसदेव येथे उजनी धरण पाणलोट परिसरात येऊन दाखल झाल्यामुळे पक्षीप्रेमी व पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे. युरोपीय देशांमध्ये मूळ वास्तव्याला असलेले हे दिमाखदार पक्षी हिवाळ्यापूर्वी भारत व पाकिस्तान या देशांच्या सीमेवरील गुजरातच्या कच्छ भागात वीण घालतात.

Pune : सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे ४१ लाखांची फसवणूक टळली

या ठिकाणी नवीन पीढीला जन्म घातल्यानंतर नवजात पिल्लांसह भारताच्या प्रवासावर निघतात. पांढरेशुभ्र परंतु गुलाबी छटा असलेले पंख, आखुड वक्राकार केशरी चोच,गुलाबी रंगाचे लांब पाय तसेच बाकदार मान हे वैशिष्ट्य असणारे फ्लेमिंगो अर्थात रोहित पक्षी सध्या इंदापूर व करमाळा तालुक्यातील कुगाव, केडगाव, सोगाव, वाशिंबे, कोंडार चिंचोळी,कुंभारगाव , टाकळी, कात्रज, डिकसळ, खानोटा, पळसदेव इत्यादी गावांच्या शिवारात पसरलेल्या पाणलोट क्षेत्रात दिवसभर विहार करताना नजरेस पडत आहेत.

जानेवारी पासून उजनी धरणातून नदी, बोगदा व कालवयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील पाणी पातळी कमी झाल्यानंतर या पक्ष्यांचा दलदलीचा पानगळ जमिनीचा चराऊ भाग उघडा पडत गेल्याचा अचूक अंदाज घेत, स्थलांतरात अतिशय तरबेज असलेले रोहित पक्षी या ठिकाणी येऊन दाखल झाले आहेत. सध्या पळसदेव परिसरामध्ये अशा प्रकारचा दलदलीचा परिसर मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्यामुळे सर्वच पक्षी मोठ्या संख्येने पळसदेव परिसरात एकवटले असून विविध जाती प्रजातींच्या हजारोच्या संख्येने पक्षी सह अधिवासात एकात्मतेचा जनु संदेशच देत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply