T20 World Cup : चाहत्यांचे वाढले टेन्शन? IND vs PAK मॅचपूर्वी कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट

Ind vs Pak T20 World Cup 2024 Rohit Sharma Update : आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2024 चारोमांचक टप्पा सुरू झाला आहे. सुपर 8 चे गणित प्रत्येक सामन्यानंतर बदलत आहे. भारतीय संघाने या वर्ल्ड कपमधील पहिला सामना आयर्लंडविरुद्ध जिंकला. आता भारतीय संघाचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. जो 9 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

मात्र, त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या फिटनेसबाबत भारतीय चाहत्यांच्या मनात शंका आहे. रोहित शर्मा पूर्णपणे फिट आहे की नाही, हा प्रश्न सध्या प्रत्येक चाहत्याच्या मनात घोळत आहे.

रोहितच्या फिटनेसबाबत काय आहे अपडेट?

खरं तर, जेव्हा भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला तेव्हा सामन्यादरम्यान रोहित शर्मा दुखापतीचा बळी ठरला. त्यामुळे अर्धशतकी खेळी खेळल्यानंतर तो निवृत्त झाला आणि मैदानाबाहेर गेला.

AFG Vs NZ : T20 वर्ल्डकपमध्ये आणखी एक उलटफेर! अफगाणिस्तानचा बलाढ्य न्यूझीलंडला 'दे धक्का'; ८४ धावांनी उडवला धुव्वा

आता भारतीय संघाला पुढचा सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त आहे की नाही हे प्रत्येक चाहत्याला जाणून घ्यायचे असते. कारण एवढ्या मोठ्या सामन्यात रोहित शर्मासारख्या दिग्गज फलंदाजाला पूर्णपणे तदुरुस्त राहणे खूप महत्त्वाचे ठरते.
भारतीय चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की, रोहित शमनि नेटमध्ये चांगली फलंदाजी केली आणि त्याला कोणत्याही प्रकारची समस्या दिसली नाहीं. यावरून रोहित शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त असून तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळता दिसु शकतो.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर सर्वांचे लक्ष लागून आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे आणि म्हणूनच त्यांच्या मोठ्या खेळाडूंनी कामगिरी करणे आवश्यक आहे. रोहित शमनि गेल्या सामन्यात चांगली फलंदाजी केली होती आणि तो फॉर्मात असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याचे पूर्णपणे तंदुरुस्त असणे टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचे आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply