Ishan Axar Surya and Abhishek Sharma IND vs PAKImage Credit source: Bcci x Account
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात टीम इंडियाने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा उडवला आहे. टीम इंडियाने या विजयासह पाकिस्तान विरुद्ध विजयी होण्याची मालिका यशस्वीरित्या कायम राखली आहे. भारताने सलामीवीर फलंदाज इशान किशन याच्या तडाखेदार खेळीच्या जोरावर पाकिस्तासमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यानंतर भारताच्या फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पाडली. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 12 बॉलआधी ऑलआऊट केलं. भारताने पाकिस्तानला 18 ओव्हरमध्ये 114 धावांवर गुंडाळलं. भारताने या विजयासह वर्ल्ड कप मोहिमेतील आपला सलग तिसरा विजय मिळवला. तसेच भारताने यासह सुपर 8 फेरीत धडक दिली आहे.
टीम इंडियाचा आठवा विजय
भारत-पाकिस्तान यांच्यातील हा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतील नववा सामना होता. टीम इंडियाने पाकिस्तानवर मात करत टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील आपला विक्रम आणखी मजबूत केला. भारताने पाकिस्तानवर एकतर्फी मात करुन एकूण आठवा विजय मिळवला.
सामन्याचा धावता आढावा
पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं. ओपनर अभिषेक शर्मा आणि ऑलराउंडर हार्दिक पंड्या दोघेही भोपळा फोडण्यात अपयशी ठरले. मात्र इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि रिंकु सिंह या 5 फलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. इशान किशन याने सर्वाधिक 77 धावा केल्या. तिलकने 25 आणि सूर्याने 32 धावांचं योगदान दिलं. शिवमने 27 धावा जोडल्या. तर रिंकुने नाबाद 11 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. भारतीय क्रिकेट संघाने यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च धावासंख्या उभारली.
पाकिस्तानसाठी सॅम अय्यूब सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. सॅमने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर सलमान आघा, उस्मान तारीक आणि शाहिन आफ्रिदी या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
पाकिस्तानला विजयी हॅट्रिकपासून रोखलं
पाकिस्तानच्या उस्मान खान याचा अपवाद वगळता इतर एकाही प्रमुख फलंदाजाला भारतीय गोलंदाजांचा सामना करता आला नाही. उस्मान खान याने 44 धावा केल्या. तर अखेरच्या क्षणी शाहिन अफ्रिदी याने नाबाद 23 धावा करुन पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. शादाब खान याने 14 आणि फहीम अश्रफने 10 धावा जोडल्या. त्याव्यतिरिक्त इतर 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियासाठी हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर कुलदीप यादव आणि तिलक वर्मा या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवून मोहिम फत्ते केली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


