IND vs PAK : बुम- बुम बुमराहाच्या गोलंदाजीसमोर 'बाबर सेना' ढेर; पाकिस्तानचा ६ धावांनी पराभव

IND vs PAK : भारत पाकिस्तानचा सामना म्हटला म्हणजे हृदयाची धकधक वाढवणारा सामना ठरत असतो. आज नासाऊ काउंटीमधील स्टेडियमवर झालेल्या सामन्यानेही दोन्ही देशाच्या क्रिकेट रसिकांची धकधक वाढवली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने माफक १२० धावांचं आव्हान ठेवलं होतं. परंतु भारतीय गोलंदाजांनी आपल्या हातांची जादू दाखवत पाकिस्तान संघाला ६ धावांनी पराभूत केलं.

जसप्रीत बुमराहने शानदारी गोलंदाजी करत पाकिस्तान संघाच्या ३ फलंदाजांना माघारी पाठवलं. बुमराहने आपल्या हाताची करामत दाखवत बाबर सेनेला १२० धावांचं आव्हान पार करणंही कठीण केलं. शेवटच्या दोन षटकांत बुमराहने पाकिस्तानच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला होता. भारताने दिलेल्या १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ७ गडी गमावत ११३ धावाच करू शकला. या सामन्यात गोलंदाजी करताना जसप्रीतन बुमराहाने ४ षटकात १४ धावा देत ३ बळी घेतले.

Ind Vs Pak Playing-11 : कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय; पाकिस्तानविरुद्ध 'या' प्लेइंग इलेव्हनसह उतरणार मैदानात

बुमराहची ही चमकदार कामगिरी पाहून त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. अनेकांचे श्वास रोखून धरणारा हा सामना न्यू यॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झाला. टी२० विश्वचषकाचा हा १९ वा सामना होता. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांनी कमालीचं प्रदर्शन करत या स्पर्धेतील सलग दुसरा सामना जिंकला. बुमराहाने ३ विकेट घेतल्या तर हार्दिक पांड्या दोन विकेट घेण्यात यशस्वी राहिला. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल एक-एक विकेट घेण्यात यशस्वी झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply