Virat Kohli Century : विराट 'विक्रमादित्य'! सचिन तेंडुलकरसमोरच मोडला सर्वाधिक शतकांचा विक्रम, वनडेत सर्वाधिक ५० शतके

Virat Kohli Century : मुबंईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंडा या दोन्ही संघांमध्ये वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना सुरु आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने भीमपराक्रम केला आहे. या डावात त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

IND Vs NZ : भारत विरूद्ध न्युझीलंड सामन्यावेळी घातपात करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका संशयिताला घेतलं ताब्यात

विराट कोहलीने या सामन्यात १०६ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केल. हे त्याच्या वनडे कारिकिर्दीतील ५० वे शतक ठरले आहे.यासह तो वनडे क्रिकेटमध्ये सचिनला मागे सोडत शतकांचं अर्धशतक पूर्ण करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ईडन गार्डन्सच्या मैदानावर त्याने ४९ वं शतक पूर्ण करत वनडेत सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली होती

वनडेत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज..

विराट कोहली - ५० शतके*

सचिन तेंडुलकर- ४९ शतके

रोहित शर्मा - ३१ शतके

रिकी पाँटिंग - ३० शतके

सनाथ जयसूर्या - २८ शतके 

वनडे क्रिकेटमध्ये शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. या यादीत ५० शतक झळकावत विराट अव्वल स्थानी आहे. तर ४९ शतक झळकावणारा सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. रोहितने ३१ शतके झळकावली आहेत. रिकी पाँटिंगने ३० तर सनाथ जयसूर्याने २८ शतके झळकावली आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply