IND vs NZ 3rd ODI : रोहित - गिलनंतर पांड्यानेही जाता जाता दिले तडाखे; भारताचा किवींविरूद्ध 385 धावांचा डोंगर

India Vs New Zealand 3rd ODI : भारताने न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात प्रथम फलंदाजी करत किवींसमोर 385 धावांचे आव्हान ठेवले. भारताकडून सलामीवीर शुभमन गिलने 112 धावांची तर रोहितने 101 धावांची शतकी खेळी केली. या दोघांनी भारताला 212 धावांची सलमी दिली. मात्र त्यानंतर भारताचा डाव गडगडला. अखेर हार्दिक पांड्याने स्लॉग ओव्हरमध्ये 54 धावांची आक्रमक खेळी करत भारताला 350 च्या पार पोहचवले.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंदौरच्या पाटा खेळपट्टीवर सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिलने पहिल्यापासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांची पिसे काढण्यास सुरूवात केली होती.

या दोघांनी 212 धावांची दमदार सलामी दिली. रोहित शर्माने तब्बल 16 महिन्यांनी शतक साजरे केले. त्याने 85 चेंडूत 101 धावा केल्या तर गिलने 78 चेंडूत 112 धावा ठोकून काढल्या. मात्र हे दोघेही शतकानंतर पाठोपाठ बाद झाले.

भारताची सलामी जोडी माघारी गेल्यानंतर भारताची मधली फळी कोलमडली. न्यूझीलंडच्या जेकब डुफीने 2 विकेट्स घेत भारताचा अवस्था 5 बाद 293 अशी केली. त्यानंतर हार्दिक पांड्याने भारताला 300 धावांच्या पार पोहचवले.

पांड्याने शेवटच्या 5 षटकात गिअर बदलत शार्दुल ठाकूरसोबत सातव्या विकेटसाठी 34 चेंडूत 54 धावांची भागीदारी रचली. त्याने 36 चेंडूत अर्धशतक ठोकले मात्र तो 54 धावा करून 49 व्या षटकात बाद झाला. त्यानंतर कुलदीप यादव आणि उमरान मलिक यांनी भारताला 9 बाद 385 धावांपर्यंत पोहचवले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply