IND vs NZ 2nd ODI : हार्दिक पांड्याचा अफलातून झेल! न्यूझीलंडचा निम्मा संघ अवघ्या १५ धावात तंबूत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमध्ये आयोजित खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने पहिल्या सामन्याप्रमाणेचे दुसऱ्या सामन्यात देखील नाणेफेक जिंकली. रायपूरमधील खेळपट्टीचा विचार करून रोहितने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरशः पळताभुई थोडी केली. भारतीय संघ मालिका जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे हे भारतीय संघाच्या खेळावरून स्पष्टपणे दिसत आहे. पाहुण्या न्यूझीलंडला त्यांचे मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी विजय गरजेचा आहे.

पहिल्या सामन्यातील दमदार विजयानंतर रायपूर येथील दुसऱ्या सामन्यात दोन्ही मोहम्मद जोडीने न्यूझीलंड फलंदाजीला मोठे हादरे देत फलंदाजीतील हवाच काढून टाकली. मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात धक्का दिल्यानंतर मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर व हार्दिक पांड्या यांनी धक्के दिले. न्यूझीलंडचा निम्मा संघ १५ धावांवर माघारी पाठवला. हार्दिकने अफलातून झेल घेत ब्लॅक कॅप्सला सर्वात मोठा धक्का दिला.

मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. पहिले चार चेंडू आउटस्विंग फेकल्यानंतर शमीने पाचवा चेंडू भन्नाट इनस्विंग टाकला अन् फिन अ‌ॅलनला काही कळण्याआधी यष्टिंवर आदळला. किवींना शून्य धावांवर पहिला धक्का बसला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावरील शमीची ५० वा बळी ठरला. अशी कामगिरी करणारा तो भारताचा १५वा गोलंदाज ठरला. मोहम्मद सिराजने सहाव्या षटकात किवींना दुसरा धक्का देताना हेन्री निकोल्सला (२) माघारी पाठवले.

मोहम्मद शमीने त्यानंतर स्वतःच्याच गोलंदाजीवर डॅरिल मिचेलचा (२) रिटर्न झेल (कॉटन बोल्ड) घेतला. आठ षटकानंतर कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजीत बदल केला. हार्दिकने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने मारलेला सरळ फटका हार्दिकने डाव्या हाताने जो जमिनीला लागण्याआधीच पकडला. न्यूझीलंडच्या फलंदाजालाही यावर विश्वास बसेनासा झाला.

त्यानंतर शार्दूलने कर्णधार टॉम लॅथमला (१) माघारी पाठवले अन् न्युझीलंडची अवस्था ५ बाद १५ अशी दयनीय केली. मागील सामन्यातील मायकेल ब्रेसवेल देखील ३० चेंडूत २२ धावा करत फार काही चमकदार कामगिरी करू शकला नाही. त्याला मोहम्मद शमीनेच बाद केले. सध्या न्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला असून ५६-६ आताची धावसंख्या आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply