IND vs NZ : १०० धावांसाठीही टीम इंडियाची उडाली भंबेरी! एक चेंडू शिल्लक असताना भारताचा विजय

India vs New Zealand 2nd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन टी-20 मालिकेतील दुसरा सामना लखनौच्या एकना स्टेडियमवर खेळल्या गेला. भारतीय संघाने पहिला टी-20 सामना 21 धावांनी गमावला, पण दुसरा सामना सहा विकेटने जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना किंवीने 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावा केल्या. भारताने 100 धावांचे लक्ष्य एका चेंडू राखून पूर्ण केले.

भारताकडून शुभमन गिल आणि ईशान किशन सलामीला आले. यादरम्यान शुभमन 11 धावा करून बाद झाला. त्याने 9 चेंडूंचा सामना करताना 2 चौकार मारले. इशान किशनने 32 चेंडूत 19 धावा केल्या. इशाननेही 2 चौकार मारले. राहुल त्रिपाठी 18 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. वॉशिंग्टन सुंदर धावबाद झाला. त्याने 9 चेंडूंचा सामना करत 10 धावा केल्या.

तत्पूर्वी, किवी संघाने 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावा केल्या. भारतीय फिरकीपटूंसमोर न्यूझीलंडचे फलंदाज हतबल दिसले. भारताच्या फिरकीपटूंनी एकूण चार विकेट घेतल्या. फिरकीपटू युजवेंद्र चहलनेही भारतासाठी विकेटचे खाते उघडले. त्याने फिन ऍलनला क्लीन बोल्ड केले. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने डेव्हॉन कॉनवेला झेलबाद केले. दीपक हुड्डाने ग्लेन फिलिप्सला बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. यानंतर कुलदीप यादवने डॅरिल मिशेलला क्लीन बोल्ड केले.

अर्शदीपने 18व्या षटकात दोन विकेट घेतल्या. कर्णधार मिचेल सँटनर 19 धावांवर नाबाद राहिला आणि जेकब डफीने सहा धावा केल्या. भारताकडून अर्शदीपने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर चहल, कुलदीप, हुड्डा, सुंदर आणि हार्दिक यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply