IND vs NZ : रोहितनं तोडलं सचिन अन् धोनीचं रेकॉर्ड! तो आता भारतीय संघातला सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे.

Rohit Sharma record - भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. शांत, संयमी खेळी ही रोहितला मान्य नाही. परिस्थिती कशी का असेना आपला खेळ वेगवान आणि आक्रमक करणं हा त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे तो इतरांपेक्षा वेगळाच ठरतो.

भारत विरुद्ध न्युझीलंडच्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मानं विक्रमी कामगिरी केली आहे. त्यानं आता भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं रेकॉर्ड ब्रेक केले आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघ आणि खेळाडू हे वेगवेगळ्या विक्रमांना गवसणी घालताना दिसत आहे. आज त्यात पुन्हा नवी भर पडली आहे.

रोहित शर्मा गेल्या काही सामन्यांपासून चांगली कामगिरी करतो आहे.त्यामुळे त्यानं विक्रमांना गवसणी घातल्याचे बोलले जात आहे. रोहित हा आता एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. त्यानं सचिन आणि धोनीलाही मागे टाकले आहे. अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. भारताचा माजी कर्णधार माहीचं रेकॉर्ड तोडल्यानं त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होतो आहे.

हैद्राबाद येथे होत असलेल्या न्युझीलंडच्या विरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताच्या विराट कोहली,रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चमकदार कामगिरी केल्याचे दिसून आले आहे. गिलनं श्रीलंकेच्याविरोधात देखील प्रभावी कामगिरी करुन प्रेक्षकांचे, चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते.

रोहित हा सर्वाधिक सिक्स मारणारा भारतीय खेळाडू झाला आहे त्याच्या नावावर १२५ षटकारांची नोंद झाली आहे. धोनीच्या नावावर १२३ षटकारांची नोंद होती.त्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (७१) षटकारांची नोंद आहे. भलेही आजच्या सामन्यात रोहितनं मोठी कामगिरी केली नसेल मात्र त्यानं ३८ चेंडुत चार चौकार, दोन षटकापरांच्या मदतीनं ठोकलेल्या ३४ धावा महत्वाच्या ठरल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply