IND vs NZ : 20 वर्षानंतर 'किवीं'वर मात न्यूझीलंडला दणका देताना टीम इंडियाकडून विक्रमांचा डोंगर

IND vs NZ : यजमान    भारताने न्यूझीलंड चा पराभव करत  विश्वचषकात सलग पाचवा विजय मिळवला आहे.विराट कोहली च्या तुफान खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला धूळ चारली. या सामन्यात कोहलीने 95 धावांची विजयी खेळी केली, तर मोहम्मद शामी  ने फलंदाजींची नाचक्की करत पाच विकेट घेतल्या. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत भारताने अनेक जुने विक्रम मोडत नवीन विक्रम रचले आहेत. विराट कोहली आणि रोहित शर्मा  आणि शुभमन गिल  यांनी नव्या विक्रमांवर नाव कोरलं आहे.

तब्बल 20 वर्षानंतर न्यूझीलंडचा विश्वचषकात पराभव

धर्मशाला येथील सामन्या न्यूझीलंडने 273 धावा केल्या. भारतासमोर 274 धावांचं आव्हन असताना भारताने दमदार खेळी करत 48 षटकांमध्ये सहज विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने चार चौकार आणि चार षटकार ठोकत 46 धावांची उत्तम खेळी केली. कोहलीने आठ चौकार आणि दोन षटकार ठोकत 95 धावांची दमदार खेळी केली. तर शामीने विकेटचा 'पंच' मारत न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने तब्बल 20 वर्षानंतर न्यूझीलंडचा विश्वचषकाच्या सामन्यात पराभव करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या सामन्यात कोणते विक्रम रचले गेले आहेत जाणून घ्या

India Vs New Zealand World Cup : इतिहास घडला , न्यूझीलंडचा चार विकेटने पराभव, विराट कोहलीची 95 धावांची झुंजार खेळी

सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा दुसरा खेळाडू

मोहम्मद शामीने भेदक गोलंदाजी करत पाच बळी घेतले. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शामीने 10 षटकात 54 धावा दिल्या. शमीला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला. यासोबतच शामीने एक विशेष कामगिरी केली आहे. यावर्षी भारताकडून खेळताना सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा शामी हा दुसरा खेळाडू ठरला आहे. यंदा शामीने तीन वेळा 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार मिळवला आहे. तर, विराट कोहली चार वेळा 'मॅन ऑफ द मॅच' ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतके

विराट कोहलीने 95 धावांची खेळी केली. या दमदारसह कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहलीने 137 वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. तर सचिन तेंडुलकरच्या नावे 136 वेळा अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम आहे. सर्वाधिक अर्धशतके झळकावण्यात रिकी पाँटिंग पहिल्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर 167 अर्धशतके आहेत.

कोहलीने आणखी एक खास विक्रम आपल्या नावावर केला. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा 90 पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कोहली 95 धावांवर बाद झाला. 90 किंवा त्याहून अधिक धावा करण्याची ही 7वी वेळ होती. मोहम्मद अझरुद्दीन आणि शिखर धवन यांनीही 7-7 वेळा अशी कामगिरी केली आहे. सचिनने एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 वेळा 90 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आणि या काळात तो बाद झाला.

दोन हजार धावांचा टप्पा जलद पार करण्याचा विक्रम

शुभमन गिलने वनडे क्रिकेटच्या इतिहासात कोणालाही न जमलेला भीम पराक्रम केला आहे. गिलने वनडे क्रिकेटमधील दोन हजार धावांचा टप्पा सर्वात कमी सामन्यात पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने हा टप्पा पार करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलाच्या नावावर होता. त्याने 40 सामन्यात हा पराक्रम केला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply