IND vs AUS, 2nd ODI: गिल-अय्यरने झोडलं अन् राहुल-सूर्याने फोडलं, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने उभारली सर्वोच्च धावसंख्या

IND vs AUS, 2nd ODI : इंदुरच्या मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने ५० षटक अखेर ५ गडी बाद ३९९ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी ४०० धावांची गरज आहे.

गिल- अय्यरचं शतक..

या सामन्यात डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला चांगली सुरूवात करता आली नव्हती. ऋतुराज गायकवाड अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शुबमन गिलने २०० धावांची भागीदारी करत भारतीय संघाची धावसंख्या २०० धावांच्या पार पोहचवली.

या डावात शुबमन गिल ९० चेंडूंमध्ये १०५ धावांची खेळी करत माघारी परतला. तर शुबमन गिल ९७ चेंडूंमध्ये १०४ धावांची खेळी करत माघारी परतला. 

सूर्या-राहुलचं अर्धशतक..

गिल आणि श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर ईशान किशनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लोबोल केला. ईशान किशनने ताबडतोड फलंदाजी करत ३१ धावा चोपल्या. मात्र त्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला.

शेवटी कर्णधार केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलने तुफान फटकेबाजी केली. केएल राहुलने या डावात ३८ चेंडूंचा सामना करत ५२ धावा चोपल्या. तर राहुल बाद झाल्यानंतर सूर्याने नाबाद ७२ धावा ठोकत भारतीय संघाची धावसंख्या ३९९ पर्यंत पोहचवली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply