IND vs AUS 1st Test : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा उडवला धुव्वा! भारताचा एक डाव अन १३२ धावांनी दणदणीत विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिला सामना नागपुरात पार पडला. शनिवारी पार पडलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाने पहिल्या डावाच्या जोरावर २२३ धावांची आघाडी घेतली होती. परंतु दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संघ ३२.२ षटकात ९१ धावांवर आटोपला. भारताकडून आर आश्विनने सर्वाधिक ८ विकेट्स घेत आस्ट्रेलिया संघाला खिंडार पाडली. भारतीय संघाने आता चार सामन्यांच्या मालिकेत १- ० अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या डावात ४०० धावा केल्यानंतर टीम इंडियाला २२३ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात सातत्याने विकेट गमावल्या. परिणामी तिसऱ्या दिवशीच संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ५१ चेंडूत २ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद २५ धावा केल्या. त्याचबरोबर भारताकडून आर आश्विनने सर्वाधिक ५ विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय ऑस्ट्रेलिया संघाला महागात पडला. त्याचा सर्व संघ ६३.५ षटकांत १७७ गुंडाळला. ऑस्ट्रेलिया संघाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. त्याने ४९ धावा केल्या. अशा पद्धतीने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन संघातील एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने सर्वाधिक पाच विकेट्स घेत ऑस्ट्रेलिया संघाला सुरुंग लावण्याचे काम केले.

भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २१२ चेंडूचा सामना करताना, १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२० धावांचे योगदान दिले. तसेच  रवींद्र जडेजा ( ७०) आणि अक्षर पटेल (८४) धावा केल्या. ऑस्ट्रेलिया संघाकडून गोलंदाजी करताना टॉड मर्फीने सर्वाधिक ७ विकेट्स घेतल्या. याबरोबर त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये  रोहित शर्मा पहिल्यांदाच संघाचे नेतृत्व करत आहे. मालिकेतील दुसरा कसोटी सामना १७ फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *