India Vs Afghanistan World Cup 2023 : भारताने अफगाणिस्तानचा 8 विकेट्स राखून केला पराभव

India Vs Afghanistan ODI World Cup 2023 : भारताने अफगाणिस्तानचे 273 धावांचे आव्हान 35 षटकात 2 फलंदाजांच्या मोबदल्यातच पार केले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 87 चेंडूत 131 धावांची तुफानी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला.

त्याने इशान किशन सोबत 156 धावांची सलामी दिली. त्यानंतर विराट कोहलीने देखील 65 चेंडूत नाबाद 55 धावा करत विजयाला हातभार लावला. अफगाणिस्तानकडून भारताच्या दोन्ही विकेट्स या राशिद खानने घेतल्या.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने 50 षटकात 7 बाद 272 धावा केल्या. कर्णधार हाश्मतुल्ला शाहिदीने झुंंजार 80 धावांची खेळी केली. त्याने अजमतुल्ला ओमरजाई (62) सोबत चौथ्या विकेटसाठी 121 धावांची दमदार भागीदारी रचली. भारताकडून जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेत दमदार गोलंदाजी केली. हार्दिक पांड्याने देखील 2 विकेट्स घेत महत्वाच्या क्षणी भारताला विकेट्स मिळवून दिल्या.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply