Imran Khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक, मारहाण आणि काहीतरी अनुचित केल्याचा PTI चा आरोप

Imran Khan arrested : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना इस्लामाबाद हायकोर्टाच्या (IHC) बाहेरून ताब्यात घेतले आहे. पीटीआयचे वकील फैसल चौधरी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पीटीआयचे नेते मुसरत चीमा यांनी ट्विटरवर एका व्हिडिओ संदेशात म्हटले की “ते सध्या इम्रान खानचा छळ करत आहेत, ते खान साहेबांना मारहाण करत आहेत. त्यांनी खान साहेबांसोबत काहीतरी केले आहे, असे आरोप देखील त्यांनी केले आहे. पीटीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटने इम्रानच्या वकिलाचा व्हिडिओही शेअर केला आहे. यात ते आयएचसीच्या बाहेर “अतिशय जखमी” झाल्याचे म्हटले आहे.

पीटीआयचे अझहर मशवानी यांनी आरोप केला आहे की इम्रान खान यांना रेंजर्सनी कोर्टाच्या आतून “अपहरण” केले आहे. त्यांनी सांगितले की पक्षाकडून देशभरात कार्यकर्त्यांना तात्काळ निदर्शने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, इस्लामाबाद पोलिसांनी सांगितले की राजधानीमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. पोलिसांनी इम्रानच्या कारला वेढा घातला होता, तसेच कोणावरही अत्याचार झाला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान आयएचसीचे मुख्य न्यायाधीश आमेर फारूक यांनी इस्लामाबादचे पोलीस प्रमुख अंतर्गत मंत्रालयाचे सचिव आणि अतिरिक्त ऍटर्नी जनरल यांना १५ मिनिटांत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले. IHC मुख्य न्यायाधीश म्हणाले की ते "संयम" दाखवत आहे, परंतु इस्लामाबादचे पोलिस प्रमुख न्यायालयात हजर न झाल्यास पंतप्रधानांना "समन्स" बजावण्यात येईल असा इशाराही न्यायधीशांनी दिला आहे. न्यायमूर्ती फारूख म्हणाले “न्यायालयात या आणि आम्हाला सांगा की इम्रानला का आणि कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली.

रॉयटर्सच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, इम्रान खान यांनी IHCच्या गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर काही वेळातच निमलष्करी दलाच्या तुकड्या आणि शस्रधारी कर्मचारी वाहन त्याच्या मागे घुसले. गेटवरच त्यांनी इम्रान खान यांना रोखले आणि कडक सुरक्षा असतानाही काही वेळातच त्यांनी त्यांना पळवून नेले. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply