हळुहळु थंडी कमी होत आहे, तापमानात वाढ झाली असून, उन्हाळ्याची चाहुल जाणवू लागली आहे, मात्र याचदरम्यान वातावरणात मोठा फेरबदल पहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 9 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील चार दिवस 9 राज्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच काळात हवेचा वेग देखील जास्त असणार आहे, पावसासोबतच 40 ते 45 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे पुढील दोन ते तीन दिवस गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्सिअस अंशाने वाढ होण्याची शक्यता आहे.
कोणत्या राज्यांमध्ये पावसाचा इशारा?
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 16 तासांमध्ये 9 राज्यात पावसाला सरुवात होण्याची शक्यता आहे. पावसासोबतच हवेचा वेग देखील जास्त राहणार असल्यामुळे हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, आयएमडी (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटं, छत्तीसगड, ओडिशा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये 23 फेब्रुवारीपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे उत्तराखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये पावसासोबतच बर्फावृष्टीची देखील शक्यता आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी तामिळनाडू आणि केरळमध्ये हवेचा वेग जास्त राहणार असून, प्रति तास 35 ते 45 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात या दोन राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
महाराष्ट्रामध्ये तापमानात वाढ होणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून, तुरळक ठिकाणी पावसाचा देखील इशारा देण्यात आला आहे. राज्यात आता उन्हाळ्याची चाहुल जाणवू लागली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel