IMD Red Alert : पुणे शहर आणि जिल्ह्याला रेड अलर्ट, खडकवासलातून २३००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Pune : पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून नदीनाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणांच्या पाणी पातळतीही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. खडकवासला धरणातूनही २३ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला असून मुळा मुठा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पुण्यातील डेक्कन जवळ असलेला भिडे पूल पाण्याखाली गेला असून नदीपात्रातील दोन्ही बाजूचे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने महापालिकेच्या समोर चार चाकी वाहने पाण्यात अडकून पडली आहेत. काही वाहने पोलीस अग्निशमन दल याच्या मदतीने काढली जात आहेत.खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने नदीचं पाणी पात्राबाहेर पडण्याची शक्यता आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असून अग्निशमन दलाकडून नागरिकांना याबाबत मेगाफोन्सद्वारे दक्षता घेणेबाबत सूचना केल्या जात आहे.

Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांना 'कंसमामा'ची उपमा; राष्ट्रपतींकडे शक्ती कायदा लागू करण्याची मागणी, आंदोलनात ठाकरे नेमकं काय म्हणाले?

नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने पुण्यातील पेठांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ⁠खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर पुण्यातील नदी पात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. भिडे पूल देखील पाण्याखाली गेला आहे. नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्यानंतर पेठांध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यात दिनांक 24 व 25 ऑगस्ट 2024 रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात घाट माथा व काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात आले असुन त्यात वाढ होण्याची श्यक्यता आहे. नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply