IMD Rain Alert : निकालाच्या दिवशीच महाराष्ट्रात तुफान पावसाचा इशारा; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

IMD Rain Alert : लोकसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडी की महायुती कोणाला जास्त जागा मिळणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. अशातच निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच राज्यात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

मुंबईसह पुण्यात कोसळणार पाऊस

भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळतील. पुण्यातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे. दुसरीकडे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तव्यात आली आहे.

Heat Stroke : जळगाव जिल्ह्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू

विदर्भ-मराठवाड्यात पावसाचा इशारा

मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात आजपासून पुढील तीन ते चार दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वची कामे तातडीने आटोपून घ्यावी असा सल्लाही देण्यात आला आहे.

येत्या २४ तासांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार?

भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबत मोठी अपडेट दिली आहे. केरळमध्ये अडखळलेला मान्सून आता पुढे सरकला असून कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात दाखल झाला. त्यामुळे पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला आहे. येत्या २४ तासांत मान्सून कोकणात आणि त्यानंतर पुण्यात दाखल होऊ शकतो. पुढच्या ५ दिवसात मौसमी वारे संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात यंदा सरासरी किती टक्के पाऊस पडणार?

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा राज्यात चांगला पाऊस होईल, असं आयएमडीने सांगितलं आहे. जून ते सप्टेंबर २०२४ दरम्यान राज्यात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही कमी दिवसांत अधिक पाऊस पडेल. त्यानंतर काही दिवस पावसात मोठे खंड पडतील. यंदा पुण्यात १०० टक्के पावसाचे प्रमाण असेल, असंही हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply