IMD Rain Alert : राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस; प्रशासन सतर्क

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचदरम्यान, भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे १२ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषत: कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

मुंबईतही पुढील दोन दिवस भारतीय हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. शनिवारी मुंबईत 'रेड' अलर्ट जारी होता, पण फक्त २.२ मिमी पाऊस झाला. मात्र, पाऊस सुरूच होता. महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांतील १३० गावांमध्ये अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात येणाऱ्या या गावांमध्ये पावसानंतर पूरस्थिती निर्माण झाली असून, त्याचा फटका लोकांना बसला आहे.

त्यानंतर आता भारतीय हवामान खात्याने राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर कोकणातही अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात गेल्या २४ तासांपासून सरासरी ३९.८ मिमी पाऊस झाला आहे. कुंडलिका नदी इशारा पातळीवर वाहत आहे. याचदरम्यान, हवामान खात्याने कोकणात पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने रायगडमध्ये २ एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच ठाणे, रत्नागिरी-चिपळूण, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या भागात 'एनडीआरएफ'ची टीम तैनात करण्यात आली आहे. तर नांदेड आणि गडचिरोलीमध्ये 'एसडीआरएफ'ची टीम तैनात करण्यात आली आहे.

गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस (Rain) सुरू झाला आहे. कोकणासह विदर्भात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस पडत आहे, आता पुढील दोन दिवसही मुंबईत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. मुंबईत १२ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट असणार आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply