Igatpuri news : इगतपुरीतील वैतरणा धरणात तिघे जण बुडाले, आठवड्याभरातील तिसरी घटना

Igatpuri news : नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातून दुर्देवी घटना समोर आली आहे. इगतपुरीतील वैतरणा धरणात तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आठवड्यांतून तिसऱ्यांदा अशी दुर्देवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या धरणात बुडून काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा इगतपुरीतील वैतरणा धरणात बुडून तिघांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. धरणावर फिरायला गेलेले असताना हा दुर्देवी प्रकार घडला. या घटनेतर स्थानिक नागरिक आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं.

Maharashtra Board SSC Result : दहावीचा निकाल लागला! कोकण सर्वश्रेष्ठ, मराठवाड्याची काय स्थिती?

इगतपुरीतील वैतरणा धरणात दोघे जण झारवड शिवारात बुडाले आहेत. तर एक जण वावी शिवारात बुडाल्याची माहिती मिळत आहे. धरणावर फिरायला गेलेल्या पर्यटकांसोबत हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे.

या घटनेनंतर काल संध्याकाळी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने शोधकार्यात अडथळा येत होता. त्यानंतर आज सोमवारी परत बचाव पथक शोधकार्य करण्यासाठी रवाना झाले आहेत. इगतपुरीत आठवड्याभरात तालुक्यात तिसरी घटना घडली आहे. या घटनेतील तिघांची नावे अजून समोर आलेली नाहीत.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply