ICICI Bank Fraud Case : ICICI बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांना सीबीआयकडून अटक

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना आर्थिक अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) अटक केली आहे. आयसीआयसीआय बँकेतील आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. चंदा कोचर यांनी पती दीपक कोचर यांना फायदा मिळवून देण्यासाठी आपल्याचा पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

चंदा कोचर मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आयसीआयसीआय बँकेने व्हिडीओकॉन समुहाला ३,२५० कोटी रुपयांचे कर्ज दिलं होतं. एप्रिल २०१२ मध्ये हे कर्ज देण्यात आले होते. यातील २,८१० कोटी रुपयांचे थकीत होते. २०१७ मध्ये हे बुडीत कर्ज म्हणून जाहीर करण्यात आले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply