ICC T-20 : “क्रिकेटपटू पैशांसाठी…”, भारतीय संघाला ११ कोटींचे बक्षीस जाहीर होताच विरोधकांची टीका

ICC T-20 : आयसीसी टी-२० विश्वचषकात विजय मिळवून भारतीय क्रिकेट संघाने ११ वर्षांनंतर आयसीसी चषकावर आपले नाव कोरले. त्यानंतर देशभरातून क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काल महाराष्ट्राच्या विधीमंडळात मुंबईकर खेळाडू रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वाल यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांनतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय क्रिकेट संघासाठी ११ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. सरकारी तिजोरीतून ११ कोटींचे बक्षीस जाहीर केल्यानंतर आता विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आधीच भारतीय संघावर कोट्यवधीची उधळण बीसीसीआयकडून झालेली असताना पुन्हा ११ कोटी देण्याची गरजच काय? असा सवाल दोन्ही विरोधी पक्षनेत्यांनी उपस्थित केला आहे.

विधानसेभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, भारतीय संघाने विश्वचषक जिंकला याचा सर्वांनाच आनंद झाला आहे. त्यांना कोट्यवधीची बक्षीसे जाहीर झाली आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ जेव्हा विश्वचषक जिंकतो, तेव्हा ते स्वतःच्या बॅगा उचलून घरी जातात. पण भारतात तशी परिस्थिती नाही. भारतातील चाहते क्रिकेटपटूंना डोक्यावर घेतात. मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आपण पाहिलं की लाखोंच्या संख्येने चाहते रस्त्यावर उतरले होते. चाहत्यांच्या भावनेकडे पाहून मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली असावी, असे दिसत आहे.

Akola News : शाळा उघडताच अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; खिचडी बनवणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply