Human Finger in Ice Cream Case : आईस्क्रीममध्ये सापडलेला बोटाचा तुकडा नेमका कुणाचा? पोलीस तपासात मोठी माहिती उघड

Human Finger in Ice Cream Case : आईस्क्रीममध्ये मानवी बोट सापडल्याच्या घटनेचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. आईस्कीमची पॅकिंग करताना एका व्यक्तीचा अपघात झाला होता. अपघातामध्ये व्यक्तीचं बोट तुटलं होतं. त्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी घेतला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी बोट सापडल्यानंतर संबंधीत कंपनीच्या आईस्क्रीम पॅक करणाऱ्या कार्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी गेल्या महिन्यात पॅकिंगवेळी एका कर्मचाऱ्याचा अपघात झाला होता. अशी माहिती समोर आली.

 

Ramdas Athawale : संविधानाबाबतच्या गैरसमजामुळेच फटका; नारायणगावमधील कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांचे प्रतिपादन

या अपघातात कर्मचाऱ्याच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाव तुटला होता. आता पोलिसांनी या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं असून आईस्कीममध्ये सापडलेल्या बोटाची आणि या व्यक्तीच्या रक्ताची चाचणी केली जाणार आहे. दोन्हीमधील DNA चाचणी मॅच होते का ते तपासलं जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच मुंबईतील मालाड परिसरात राहणाऱ्या एका महिलेने यम्मो आईस्क्रिम घरी मागवली होती. त्यावेळी तिला यात एक मानवी बोट सापडलं होतं. मानवी बोट सापडल्यानंतर महिलेने मालाड पोलिसांत या प्रकरणी तक्रार नोंदवली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply