HSC Result 2025 : मोठी बातमी! बारावी बोर्डाचा निकाल जाहीर, ९१.८८ टक्के विद्यार्थी पास!

HSC Result 2025  : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (MSBSHSE) घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल जाहीर करण्यात आला. बारावीचे विद्यार्थी आणि पालक निकाल कधी लागणार याची वाट पाहत होते. अखेर त्यांची प्रतीक्षा आज संपली. बारावीचा निकाल बोर्डाकडून जाहीर करण्यात आला आहे. बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे.

दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना वेबसाईटवर जाऊन आपला निकाल पाहायला मिळणार आहे. राज्य मंडळाचा हा निकाल 'https://results.digilocker.gov.in' आणि 'https://mahahsscboard.in' या वेबसाईटवर पाहता येणार आहे.

राज्य मंडळाने यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करत नवा विक्रम केला आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी आज बारावीचा निकाल जाहीर केला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. बारावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या ९ विभागीय मंडळांतर्फे घेण्यात आल्या होत्या.

Pune : पुणेकरांवर आजपासून पाणीसंकट, कोणत्या दिवशी कोणत्या भागात पाणीकपात?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. त्यामध्ये ८,१०,३४८ मुलं, ६,९४,६५२ मुली आणि ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती. तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती.

निकाल कुठे पाहाल -

१. https://results.digilocker.gov.in

२. https://mahahsscboard.in

३. http://hscresult.mkcl.org

४. https://results.targetpublications.org

५. https://results.navneet.com

कसा पाहाल निकाल?

- विद्यार्थ्यांनी सर्वात आधी बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जावे.

- होमपेजवर ‘महाराष्ट्र एसएससी/एचएससी निकाल 2025’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करावे.

- क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे अचूक नाव टाका. त्यानंतर ‘सबमिट’ बटनवर क्लिक करा.

- त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

- हा निकालाची प्रत डाऊनलोड करून ठेवा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply