HSC Exam : ड्रोन कॅमेराची नजर नावालाच; बारावी परीक्षेत एकाही केंद्रावर झाले नाही ड्रोनद्वारे चित्रीकरण

Chhatrapati Sambhajinagar : दहावी आणि बारावी परीक्षेच्या काळात गैरप्रकार होऊ नये; अर्थात कॉपी मुक्त अभियान राबविण्यासाठी प्रत्येक केंद्रावर ड्रोनद्वारे गस्त घालणार असल्याचे बोर्डाने सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र त्या गप्पाच निघाल्याचे पाहण्यास मिळत आहे. आजपासून सुरु झालेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान एका देखील केंद्रावर ड्रोन फिरविण्यात आले नसल्याचे पाहण्यास मिळाले.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा काळात बोर्डाकडून कॉपी मुक्त परीक्षा करण्यासाठी दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना राबविल्या जातात. यंदा केंद्रावर कर्मचाऱ्यांची अदलाबदली करण्याच्या निर्णयासोबत प्रत्येक परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे पाहणी केली जाणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. अर्थात कॉपीमुक्त परीक्षेसाठी आणि परीक्षेच्या काळामध्ये परीक्षा केंद्राच्या परिसरात गैरप्रकार होऊ नये; म्हणून यावर्षी ड्रोन द्वारे नजर ठेवणार असं बोर्डाच्या वतीने सांगण्यात आलं होतं.

Badlapur Accident : बदलापूरात अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची डंपरला धडक, घटना सीसीटीव्हीत कैद

केवळ व्हिडीओ चित्रीकरण

दरम्यान आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली आहे. पहिला पेपर संपला असून प्रत्यक्षात कुठेही ड्रोन उडाले नाहीत. संवेदनशील परीक्षा केंद्रावर देखील ड्रोन कॅमेरेद्वारे चित्रीकरण करण्यात येणार होते. मात्र तसे आदेशच नसल्याने फक्त व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत असल्याचं छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

आदेशात उल्लेखच नाही

दरम्यान राज्य परीक्षा मंडळाचे राज्य सचिवाने काढलेल्या आदेशात ड्रोन चित्रीकरणाचा उल्लेखच नसल्याने राज्यात ड्रोन चित्रीकरण केलं गेलं नाही. त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षेच्या काळात परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेरेद्वारे गस्त घालणार असल्याच्या बोर्डाच्या केवळ गप्पाच निघाल्या; असे आता बोलले जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply