HSC Exam : बारावीच्या परीक्षेचा घेतला ताण; पनवेलमधील विद्यार्थ्याची आत्महत्या

HSC Exam : इयत्ता बारावीच्या परिक्षेस आजपासून प्रारंभ झाला. दरम्यान या परिक्षेला घाबरुन राज्यातील दाेन विद्यार्थ्यांनी त्यांचे जीवन संपविले. साेमवारी सायंकाळच्या सुमारास पनवेल येथील एका सतरा वर्षीय मुलाने राहत्या घरात आत्महत्या केली. या घटनेच्या वेळेस त्याच्या आई वडील घराबाहेर हाेते. 

बारावीची परीक्षेस आजपासून (मंगळवार २१ फेब्रुवारी) प्रारंभ झाला. या परीक्षेचा पहिला पेपर आज झाला. त्यास हजारो विद्यार्थी बसले हाेते. मात्र, परीक्षा सुरू होण्यापुर्वी महाराष्ट्रात दाेन दुर्देवी घटना घडल्या आहेत. औरंगाबाद येथे एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. तसेच पनवेल येथे दुसरी धक्कादायक घटना घडल्याचे समाेर आले आहे.

पनवेल येथील वंश नवनाथ म्हात्रे याने अभ्यासाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पाेलिसांनी दिली. वंश हा देवदर्शन सोसायटीत वास्तव्या हाेता. ताे इयत्ता बारावीत हाेता. आज त्याचा पहिला पेपर हाेता. आई वडील घरात नसताना त्याने आत्महत्या केली. दरम्यान विद्यार्थ्यांनी परिक्षेला घाबरुन जाऊ नये त्यास सामाेरे जावे. स्वत:च्या जीवापेक्षा परिक्षा महत्वाची नाही. त्यामुळे काही अडचण असल्यास पालकांशी संवाद साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रमाेद पवार यांनी केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply