Hording Collapse : पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्त केली भीती

Hording Collapse : मुंबईत सोमवारी होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर गुरुवारी पिंपरी-चिंचवडमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर आता पुण्याच्या भोर तालुक्यातही होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. या दुर्घटनेनंतर नागरिकांनी होर्डिंग कोसळण्याच्या घटना घडू शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे.

 

पुण्याच्या भोर तालुक्यात गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पुणे सातारा महामार्गावरच्या सेवा रस्त्यालगत सारोळे गवाच्या हद्दीत असलेलं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. होर्डिंग आकारमानाने लहान असल्यानं आणि रस्त्याच्या बाजूला होर्डिंग कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे.येत्या चार दिवसांत या भागातील अनधिकृत होर्डिंग कारवाई करणार आहे. असे होर्डिंग नामशेष करण्यात येतील, पुणे प्राधिकारणाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

Pune Breaking News : पोलिसांना गुंगारा, धावत्या ट्रेनमधून उडी टाकून आरोपी फरार; पुण्यात खळबळ

पुणे महामहापालिकेकडून ९ होर्डिंग जमीनदोस्त

पुणे महापालिकेने आयुक्तांच्या आदेशानुसार दिवसभरात ९ जाहिरात फलक जमीनदोस्त केले आहेत. कोथरूड- बावधन क्षेत्र, वानवडी क्षेत्र, वारजे- कर्वेनगर क्षेत्र या भागात अनुक्रमे ५,३,१ जाहिरात फलक जमीनदोस्त करण्यात आले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply