HMPV Virus : चीनमधील नव्या व्हायरसमुळे हाहाकार; जगावर HMPV व्हायरसचं मोठं संकट

HMPV Virus : जगभरात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या कोरोनानंतर आता चीनमध्ये नव्या विषाणूने धुमाकूळ घातलाय. त्यामुळे हे नवं संकट भारताच्या उंबरठ्यावर कधीही धडकण्याची शक्यता आहे. हा HMPV हा नवा व्हायरस किती घातक आहे? तो कसा पसरतो? त्याची लक्षणं काय आहेत ? 

2020 मधील कोरोना संकटानंतर आता चीनमध्ये HMPV नावाच्या नव्या व्हायरसने धुमाकुळ घातलाय. ह्युमन मेटा प्युमोव्हायरस नावाच्या विषाणूच्या संसर्गामुळे चीनमधील परिस्थिती बिघडत चाललीय.. एवढंच नाही तर चीनमधील हॉस्पिटल फुल झालेत. त्याबरोबरच स्मशानभुमीतही मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पहायला मिळतंय. त्यामुळे या नव्या HMPV नावाच्या व्हायरसमुळे जगाचं टेन्शन वाढलंय...या विषाणूची लक्षणं काय आहेत? 

HMPV Virus : चीनमध्ये नव्या व्हायरसचं थैमान; HMPV व्हायरसचा चिमुकल्यांना धोका

HMPV ची लक्षणं

सर्दी

खोकला

ताप

घसा खवखवणे

धाप लागणे

जुलाब

अंगावर पुरळ

कोरोना प्रमाणेच घातक असलेल्या HMPV या विषाणूचा संसर्ग नेमका कसा होतो? पाहूयात.

कसा होतो HMPV चा प्रसार?

खोकला, शिंका किंवा संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्यानं संसर्ग

संक्रमित लोकांनी वापरलेल्या वस्तूंमुळे संसर्ग

संसर्गाचा कालावधी 3 ते 5 दिवसांचा

लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींना लवकर संसर्ग

मात्र या भयंकर विषाणूपासून वाचण्यासाठी नेमकी काय काळजी घ्यायला हवी? पाहूयात.

काय काळजी घ्याल?

मास्क घाला

गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

वारंवार हात स्वच्छ धुवा

चीनमधील परिस्थिती गंभीर होत असताना चीन मात्र कोरोना प्रमाणेच या विषाणूची माहिती लपवत असल्याचं समोर आलंय . त्यातच या नव्या विषाणूवर कुठलीही लस उपलब्ध नसल्याने हा विषाणू आणकीच घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनासारखं गंभीर संकट कधी आपल्या उंबरठ्यावर येवून ठेपेल हे सांगता येत नाही. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची गरज आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply