HMPV Virus : कुंभमेळ्यावर HMPVचं संकट; चिनी लोकांना थांबवा, साधुंकडून पंतप्रधान मोदींना पत्र

 

HMPV Virus  : देशात चीनी HMPV चे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडालीय...आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही पसरलंय.. देशविदेशातून कोट्यवधी लोक कुंभमेळ्याला येतात... याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी मोदींना पत्र पाठवलंय..काय म्हटलंय या पत्रात पाहूया

कोव्हिडच्या विनाशकारी साथीनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं. आता पुन्हा एकदा नव्या व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं समोर आल्यानं अनेक देश चिंतेत पडले आहेत.या विषाणूमुळे सर्दी आणि कोविड-19 मध्ये दिसायची तशी लक्षणे आढळतात, तसंच याचा प्रसार वेगाने होत असल्याची माहिती आरोग्य संघटनांनी दिलीये. त्यामुळे आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही पसरलंय.

देशविदेशातून कोट्यवधी लोक कुंभमेळ्याला येतात. त्यामुळे भारताची चिंता वाढलीये...हा नवा HMPV व्हायरस काय आहे पाहूया.

कोरोना आलाय, लहान मुलांना सांभाळा

HMPV विषाणूची सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक

रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त

HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो

लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो, मुलांना श्वास घेण्यास त्रास

दमा किंवा ब्रॉन्कायटिससारखा आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका

याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय.. चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आलीय.. 12 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु होणार आहे. देशात चीनी HMPV चे तीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडालीय.कुंभमेळ्याला होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारी घ्यायलाच हवी. अन्यथा पुन्हा कोरोनासारख्या भयावह परिस्थितीचा देशाला सामना करावा लागेल.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply