हिरामण खोसकर, अजित पवार, शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षImage Credit source: टीव्ही ९ मराठी
Hiraman Khoskar on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी शरद पवार गोटातूनच दावे करण्यात येत होते. पण आता अजितदादांच्या राष्ट्रवादीमधूनही हा आवाज बुलंद होताना दिसत आहेत. दादांच्या गोटातील वरिष्ठ नेत्यांनी कानावर हात ठेवलेले असतानाच आमदार मात्र विलिनीकरणासाठी आग्रही भूमिका घेताना दिसून येत आहे. अजितदादा यांच्या गटातील आमदार हिरामण खोसकर यांनी मोठा दावा केला आहे. विलिनीकरणासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना विनंती करणार असल्याचे खोसकर यांनी सांगितले.
हिरामण खोसकर यांची विलिनीकरणासाठी आग्रही मागणी
इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण शंभर टक्के झालं पाहिजे. जर दोन्ही पक्षांना जर वाटतं असेल की आपला नेता गेला. लीडर गेला. नेत्याला जर खरी श्रद्धांजली वाहायची असेल तर त्यांचं जे दोन-तीन महिन्यापासून सुरू होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं. तसं झालं तर आम्हाला आनंद होईल. आम्हाला सुनेत्रा पवार या गॉडफादर आहेत. पण त्यांच्या मागे दोन्ही पक्षांनी भक्कम पाठिंबा द्यायला हवा असे स्पष्ट मतं हिरामण खोसकर यांनी व्यक्त केलं.
१२ फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होण्याची चर्चा
शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. जयंत पाटील हे अनुभवी नेते आहेत. बाळासाहेबे पाटील आहेत. राजेश टोपे हे आहेत. विलिनीकरण झाले तर आम्हाला मोठा दिलासा मिळेल. ही चांगली गोष्ट होईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. १२ फेब्रुवारी रोजी विलिनीकरण होणार हे आम्ही ऐकले होते. दादांनी आम्हाला तशी कल्पना दिली नव्हती. पण विलिनीकरण होणार हे शंभर टक्के माहिती होतं, असं खोसकर म्हणाले.
सुनेत्रा पवार व्हाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष
आमच्या कानावर विलिनीकरणाची चर्चा येत होती. विलिनीकरण जर झाले तर राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार या असाव्यात. शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा द्यावा. शशिकांत शिंदे दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत जे म्हणत आहेत, ते शंभर टक्के झालं पाहिजे. दोन्ही पक्ष एकत्र आल्यास सर्वांनाच दिलासा मिळेल असे खोसकर म्हणाले.
30-35 आमदार विलिनीकरणाच्या बाजूने
सुनेत्रा पवार यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यादिवशीच 30-35 आमदार विलिनीकरणाच्या बाजूने होते. तशी चर्चाही झाली होती. 40 पैकी 30-35 आमदारांमध्ये विलिनीकरणाची चर्चा झाल्याचा दावा हिरामण खोसकर यांनी केला. मंत्री मकरंद पाटील यांनी तर स्पष्ट सांगितलं, असा दावा त्यांनी केला. मंगळवारी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. सुनेत्रा पवार यांनी ही बैठक बोलावली आहे. त्यात मी विलिनीकरण व्हावे अशी स्पष्ट भूमिका मांडणार असल्याचे हिरामण खोसकर यांनी सांगितले. शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांशी आपली चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तर इतका मोठा नेता गेला त्यामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना विनंती करणार असल्याचे खोसकर म्हणाले.
[embedded content]
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

