Hingoli News : महायुतीत मिठाचा खडा! हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करा; भाजप आमदारांची मागणी

Hingoli News : राज्यातील महायुतीकडून हिंगोली लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाकडून जोरदार विरोध केला जात असून उमेदवारी बदलण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून करण्यात आली आहे.

हिंगोलीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपा आमदार नामदेव ससाने ,आमदार तानाजी मुटकुळे व आमदार भीमराव केराम उपस्थित होते. यावेळी हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवरुन चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Narendra Bhondekar : बागेश्वर बाबांना 4 वाजेपर्यंत अटक करा, अन्यथा कायदा व्यवस्था बिघडू शकते : आमदार नरेंद्र भोंडेकर

हिंगोली लोकसभेसाठी महायुतीकडून उमेदवार बदलून देण्यात यावा, ही जागा पक्षश्रेष्ठींनी भाजपसाठी घ्यावी अशी मागणी या बैठकीत केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जागा सोडायला तयार नसतील तर भाजपच्या उमेदवाराला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढविण्यास सांगावे, आम्ही ही जागा निवडून आणू असा ठराव देखील या बैठकीत घेण्यात आला आहे.

आढावा बैठकीत "भाजपचा उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवेल, पण हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करा," अशी मागणी भाजप आमदार तानाजी मटकुळे यांनी केली. यावेळी हेमंत पाटील यांच्या उमेवारीविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी हिंगोलीचा तिढा कसा सोडवतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply