Sand Mafia : हिंगोलीत वाळू माफियांचा हैदोस; तहसील कार्यालयातून जप्त केलेले ट्रॅक्टर पळवले

Hingoli : वाळू माफिया प्रशासनाला जुमानत असल्याचे प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. एकीकडे वाळूची चोरटी वाहतूक करण्यासोबतच प्रशासनाने कारवाई करत जप्त केलेले वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टर तहसील कार्यालयातुन पळवून नेण्यापर्यंत मजल पोहचली आहे. यामुळे हिंगोलीमध्ये वाळू माफियांचा हौदोस पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे.

नदीतील वाळू वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळूची चोरटी वाहतूक वाळू माफियांकडून करण्यात येत आहे. तर कारवाईसाठी जाणाऱ्या पथकावर देखील या वाळू माफियांकडून हल्ले करण्यात येत असतात. अर्थात वाळू माफियांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहण्यास मिळत आहे. अशातच हिंगोली जिल्हा प्रशासनाने कारवाई करत वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले होते.

Pahalgam Attack : मोने, लेले आणि जोशींच्या आठवणी; पहलगाम हल्ल्यातील मृतांचे डोबिंवलीत स्मृतीस्थळ उभारणार

चोख सुरक्षा असतानाही ट्रॅक्टर चोरी

हिंगोलीच्या औंढा तहसील कार्यालयात महसूल प्रशासनाने वाळू चोरी करताना पकडलेले चार ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या आवारात लावले होते. मात्र वाळू माफियांनी तहसील कार्यालयाच्या परिसरातून हे ट्रॅक्टर पळून नेले आहेत. धक्कादायक म्हणजे महसूल प्रशासनाने तहसील कार्यालय व परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावले आहेत. मात्र चौख सुरक्षा असताना देखील वाळू माफियांनी हे ट्रॅक्टर पळविल्याने खळबळ उडाली आहे.

गुन्हा दाखल करण्यात येणार

दरम्यान आता महसूल प्रशासनाने ट्रॅक्टर पळविणाऱ्या वाळू माफिया विरोधात कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. औंढा पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे. मात्र या सगळ्या प्रकाराने हिंगोलीत वाळू माफियाची दादागिरी किती वाढली हे देखील स्पष्ट झाले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply