Hingoli : हृदयद्रावक! पत्नी जीव द्यायला गेली, नवरा वाचवायला पळाला, विहिरीत बुडून दोघांचाही मृत्यू

Hingoli Local News : हिंगोलीमध्ये पती आणि पत्नीच्या मृत्यूची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पत्नीने आयुष्य संपवण्यासाठी विहिरीत उडी घेतली, नवरा वाचवण्यासाठी धावला, त्याने उडीही घेतली. पण दोघांचाही अंत झाला. या घटनेमुळे हिंगोलीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुल्लक कारणामुळे पत्नीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला, वाचवण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचाही जीव गेला.

 

हिंगोलीतील या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांना विहीरीच्या बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे. पोलिसांकडून घटनास्थळावर चौकशी करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींना, शेजाऱ्यांना माहिती विचारली जात आहे. पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू करण्यात येत आहे.

JNPA Port To Gateway of India Travel : एकच नंबर! जेएनपीए ते गेट वे फक्त २५ मिनिटांत, लाकडी बोटींची जागा स्पीडबोट घेणार

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुडणाऱ्या पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत गेलेल्या पतीचाही या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हिंगोलीतील अकोला बायपास परिसरामध्ये आज सकाळी ११ वाजताच्या आसपास ही धक्कादायक घटना घडली.

या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पती-पत्नी असे दोघांचेही मृतदेह बाहेर काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान रात्री देखील एका पोलीस कर्मचार्‍याने कौटुंबिक वादामधून आपल्या संपूर्ण कुटुंबावर गोळीबार केला होता, या घटनेत देखील पत्नीचा मृत्यू झाला होता.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply