Hingoli News : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; बिहारकडे जाताना पोलिसांनी घेतले ताब्यात

 

Hingoli : मुलींना आमिष दाखवून पळवून नेण्याचे तसेच अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच हिंगोलीतील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले जात होते. मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या सात तासातच बिहारी बाबुला ताब्यात घेतले आहे.

हिंगोली (Hingoli) शहरातील अल्पवयीन मुलगी आज सकाळपासून बेपत्ता झाली होती. पालकांनी शोध घेतल्यानंतर ती सापडून न आल्याने मुलगी घरातून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसात दिली होती. दरम्यान या गुन्ह्याचा तपास करताना या अल्पवयीन मुलीला एका बिहारी व्यक्तीने पळून नेले असून यवतमाळमार्गे तो बिहारला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस (Police) त्याच्या मागावर लागले होते.

Mumbai : मुंबईकरांना मिळणार अतिरिक्त पाणी; आता पाणीविसर्गाचीही होणार साठवणूक, BMCकडून हालचालींना गती

यवतमाळ रेल्वे स्टेशनवरून घेतले ताब्यात

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी यवतमाळ रेल्वे स्थानकावर बिहारी बाबूसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या आई- वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply