Hindu Jangarjana Morcha : धर्मांतरविरोधी जनजागृतीसाठी हिंदू जनगर्जनेचा मोर्चा

हडपसर - धर्मांतरासाठी रचलेल्या चक्रव्यूहात अनेक हिंदू अडकत आहेत. त्याकडे पोलीस प्रशासन तक्रार देवूनही दुर्लक्ष करीत आहे. येथील शिंदे वस्तीतील एका महिलेला अशा प्रकारचा त्रास सहन करावा लागला आहे. त्यासाठी हिंदू जनगर्जना मोर्चा व सकल हिंदू समाजाच्या वतीने येथील मगरपट्टा चौकात जागृती सभेचे आयोजन केले होते.

आमदार राम सातपुते म्हणाले, 'हिंदू धर्मातील गरीब, आर्थिक मागास व्यक्तींना लक्ष करून धर्मांतर करण्याचे प्रकार समोर येत आहेत. काही पोलिसांकडून त्याबाबत तक्रार देऊनही गांभिर्याने दखल घेतली जात नाही. हडपसर पोलिसठाण्याचे निरीक्षक आर्थिक तडजोडीने खोटे गुन्हे दाखल करीत आहेत. त्यांची तत्काळ बदली व्हावी यासाठी आपण येत्या अधिवेशनात आवाज उठवणार आहोत.

याशिवाय राज्यात हिंदू धर्मांतराचा कायदाही लवकरात लवकर लागू करण्यात यावा यासाठी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार आहे. अनेक वर्षापासून येथील एका महिलेवर अत्याचार होतोय. गुन्हा दाखल करण्याची मागणी करूनही तो न करता उलट तिच्यावरच गुन्हा दाखल केला जात आहे.

Konkan Ganeshotsav 2023 : कोकणवासियांना बाप्पा पावला, आता प्रवास होणार सुसाट; कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू

या पुढे हिंदू असे खोटे गुन्हे खपवून घेणार नाही. अंधश्रद्धेच्या माध्यमातून धर्मांतर करण्याचे काम केले जात आहे. याकडे पोलिसांनी लक्ष द्यायला हवे. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे कदापि अशा गोष्टीला माफ करणार नाहीत.'

माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहर प्रमुख नाना भानगिरे, माजी नगरसेवक मारुती तुपे, माजी नगरसेविका उज्वला जंगले, विजया वाडकर, संदीप दळवी, भूषण तुपे, नितीन होले, स्वाती कुरणे, सुभाष जंगले, मनोहर देशमुख, संदीप लोणकर, शिवराज घुले, शैलेंद्र बेल्हेकर, रवि तुपे, अभिजीत बोराटे, जीवन जाधव, प्रमोद सातव, विकास भुजबळ, डॉ.दादा कोद्रे, पोपट वाडकर आदिंसह परिसरातील हिंदू महिला, पुरूष यावेळी उपस्थित होते.

'येथील प्रत्येक सर्वसामान्य माणसाला ठाण्यात प्रवेश दिला जात आहे. प्राधान्याने त्यांच्या तक्रारीही नोंदविल्या जात आहेत. वस्तुस्थिती लक्षात घेऊन कायदेशीर कारवाई केली जात आहे. शिंदे वस्ती येथे दोन कुटूंबात जमिनीच्या आर्थिक व्यवहाराचा वाद होता.

दोघांच्याही तक्रारी असल्याने परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांवर होणाऱ्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. पोलिस ठाण्याचे सर्व कामकाज नियमानुसारच व कायदेशीर पद्धतीने सुरु आहे.'

- रवींद्र शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply