Hindenburg Report on Adani : गौतम अदानींच्या अडचणीत वाढ; सर्वोच्च न्यायालयाचा दणका

सर्वोच्च न्यायालयाने अदानी समुहाबद्दल प्रसिद्ध करण्यात आलेल्या हिंडनबर्ग अहवाल प्रकरणात अदानींना मोठा दणका दिला आहे. माध्यम वार्तांकनासंदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वकील एमएल शर्मा यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर आज सुनावणी पार पडली त्यावेळी न्यायालयाच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड म्हणाले, "आम्ही मीडियाच्या विरोधात कोणताही आदेश देणार नाही. आम्ही तेच करू जे आम्हाला करायचं आहे. आम्ही आमचा आदेश जारी करू." एमएल शर्मा यांनी हिंडनबर्ग अहवालाच्या विरोधात चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. तसंच जोवर यासाठी सर्वोच्च न्यायालयाची समिती स्थापन होत नाही, तोवर याप्रकरणी माध्यमांचं वार्तांकन होऊ नये, अशी मागणीही केली होती.

Follow us -

अदानी समुहाबद्दलचा वादग्रस्त अहवाल जारी करणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चवर कारवाई करण्याची मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे. या रिसर्चचे संस्थापक नॅथन अँडरसन आणि त्यांच्या भारतातल्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीही केली आहे. अद्याप याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply