Himachal Pradesh Rain : हिमाचलमध्ये पावसाचा कहर; 50 जणांचा मृत्यू, 40 जण मलब्याखाली दबल्याचा अंदाज

Himachal Pradesh Rain Updates : हिमाचल प्रदेशमध्ये पुन्हा एकदा पावसाने हाहाःकार माजवला आहे. राज्यात भूस्खलन आणि जोरदार पावसामुळे 24 तासांत ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

माध्यमांशी बोलतांना हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, राज्यात मागच्या २४ तासांमध्ये ५० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. २० पेक्षा जास्त नागरिक अडकून पडलेले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

शिमलाच्या समर हिल भागामध्ये भूस्सखलन झाल्याने आज दुर्दैवी घटना घडली. तब्बल ९ जणांचा मलब्याखाली अडकून मृत्यू झाला. एनडीआरएफचे अधिकारी नफीस खान यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, येथे ३० ते ४० लोक अडल्याची शक्यता आहे. आमच्या १४ टीम बचावकार्यासाठी पोहोचल्या आहेत. यासह एसडीआरएफची टीमसुद्धा दाखल झालेली असून घटनास्थळी प्रचंड मलबा जमा झाला आहे.

Thane Kalwa Hospital : कळवा रुग्णालयातील १८ रुग्णांच्या मृत्युप्रकरणी चौकशी समिती गठीत; डॉक्टर-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई?

डीएसपी मुख्यालय शिमला विजय रघुवंशी यांनी सांगितलं की, घटनास्थळी काम करणं अवघड जात आहे. लोक सहकार्य करीत आहेत. परंतु किती लोक दुर्घटनाग्रस्त झालेले आहेत हे अद्याप लक्षात आलेलं नाही. एसीडीएम, एसपी आणि एसडीआरएफ सगळी पथकं दाखल झालेली आहेत. पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत परंतु आम्ही रेस्क्यू ऑपरेशनवर लक्ष केंद्रीत केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवमंदिरात झालेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू हे अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले होते. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीच बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. शिवाय उद्या १५ ऑगस्ट रोजी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply