Ajit Pawar : पूरग्रस्तांना तातडीने १० हजारांची मदत दिली जाणार, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

Mumbai News : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांचं शेतीची, घराचं पावसाच्या पाण्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. राज्यातील अशा सर्व नागरिकांच्या मदतीसाठी आता सरकार पुढे आलं आहे.

अतिवृष्टीमुळे बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मोफत धान्य पुरवलं जाणार आहे. आजच नागरिकांना धान्य मिळावं यासाठी स्वस्त धान्याच्या दुकानात पुरेसे धान्य पोहोचवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
 

पूरग्रस्तांना तातडीची मदत

पूरग्रस्तांना तातडीने १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. रोगराई पसरू नये यासाठी योग्य ती फवारणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहे.

ज्याठिकाणी अतिवृष्टीमुळे रस्ते वाहून गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे, तिथे तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला अजित पवार यांनी दिले आहेत. 

पूरामुळे ज्या विद्यार्थ्यांचे शालेय साहित्य खराब झालं आहेत, त्यांना साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही शिक्षण विभागाला दिल्या आहेत. भंडारा जिल्ह्यातील वीज पडून मृत्यू झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना उद्यापर्यंत मदत दिली जाणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply