Heavy Rain In Nashik, Maharashtra : नाशिक जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, मुंबई, ठाण्यासह या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Heavy Rain In Nashik, Maharashtra : नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागाला अवकाळीचा तडाखा बसला आहे. विजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे.

पावसामुळे आणि जायकवाडीला पाणी सोडण्यात आल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली. त्यामुळे नदीकाठावर पार्क करण्यात आलेल्या पर्यटकांच्या वाहनांना पाण्याचा वेढा पडला होता. अनेक वाहने पाण्यात अडकून पडली होती. तर निफाड परिसरात प्रचंड गारपीट झाल्याने कांदा, द्राक्षासह अन्य पिकांना मोठा फटाका बसला आहे.

Mumbai Rain News : मुंबईसह राज्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाची हजेरी, आज अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता

दरम्यान पुढील तीन तास मुंबई,ठाण्यासह पालघर,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाना आणि या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

एकीकडे गंगापूर धरणातून जायकवाडीकडे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे नाशिक शहरात पाऊस सुरू झाल्याने शहरात गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पर्यटकांनी पार्क केलेली वाहने अडकून पडली आहेत. दरम्यान पोलिसांकडून खबरदारी घेण्याच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply