Heat Stroke : जळगाव जिल्ह्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू

Heat Stroke :  जळगाव जिल्ह्यात तापमानाचा उच्चांक गाठला आहे. वाढत्या तापमानाचा त्रास होऊन भडगाव तालुक्यातील गिरड येथील एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. शेतात काम करत असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. 

भडगाव तालुक्यातील गिरड येथील शेतकरी प्रकाश विठ्ठलराव पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. प्रकाश पाटील हे दुपारी शेतात काम करीत असताना त्यांचा मृत्यू झाला. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान शेतात भर उन्हात ते ठिंबक नळ्या ओढणे व खुट्या ठोकण्याचे काम करत होते. याच वेळी त्यांना मळमळ, डोके दुखण्याचा त्रास जाणवू लागला. यामुळे ते झाडाखाली बसले.  

त्रास होत असल्याने त्यांनी भाऊ शरद पाटील यांना फोन लाऊन शेतात बोलावले. मात्र शरद पाटील हे शेतात गेल्यावर काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली होती. उष्माघाताचा त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज असून डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply