Hatnur Dam : हतनूर धरणातून पाण्याचा विसर्गाने तापीला पूर; सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे दोन दरवाजेही उघडणार

Hatnur Dam : नंदुरबार  हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरण भरले आहे. यामुळे मंगळवारी धरणाचे १४ दरवाजे उघडून तापी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने तापीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजचे प्रत्येकी दोन दरवाजे उघडण्यात येणार आहे.


तापी नदीच्या (Tapi River) उगम क्षेत्रात तसेच हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हतनूर धरणाची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यासाठी धरणाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत. (Hatnur Dam) धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने तापी नदीला मोठा पूर आला आहे. तापी नदीचे हे पाणी नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजपर्यंत पोहचले आहे. यातील सारंगखेडा बॅरेजची पाणी पातळी वाढत असून यातील पाणी जवळच असलेल्या प्रकाश बॅरेजमध्ये जाते.

Kalyan News : अनधिकृत बांधकामाची तक्रार केल्याने तक्रारदारच्या घरावर हल्ला; डोंबिवली कोपरमधील धक्कादायक घटना

दरम्यान पाण्याची पातळी वाढत असल्याने दोन्ही बॅरेजची पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी बॅरेजचे (sarangkheda Barrage) दोन दरवाजे उघडण्यात येणार आहे. यापूर्वीच दोन्ही बॅरेजचे प्रत्येकी एक दरवाजा उघडण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच तापी पात्रात विसर्ग सुरू असून नदी काठावर वरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply