Harmanpreet Kaur : हरमनप्रीत कौरने रचला इतिहास, बनली टीम इंडियाची पहिली 'कर्णधार'

Asian Games 2023 Harmanpreet Kaur : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आज आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरले तेव्हा इतिहास रचला. भारतासाठी आजपर्यंत कोणतीही महिला कर्णधार जे करू शकली नाही, ते हरमनप्रीत कौरने केले आहे.

भारतीय महिला संघाने यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन सामने खेळले होते, ज्यामध्ये ती कर्णधार नव्हती, कारण आयसीसीने तिच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली होती. पण श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामन्यात ती मैदानात खेळण्यासाठी उतारली आणि नवा विक्रम केला.

हरमनप्रीत कौरने आता 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. आतापर्यंत जगात फक्त दोनच महिला कर्णधार आहेत ज्यांनी 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. याआधी केवळ ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंगला ही कामगिरी करता आली आहे.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील 100 सामन्यांपैकी तिने 56 जिंकले आहेत आणि 38 गमावले आहेत. जर आपण मेग लॅनिंगबद्दल बोललो तर 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी तिने 76 जिंकले आहेत आणि 18 गमावले आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाला उपांत्यपूर्व फेरीत थेट प्रवेश मिळाला. पहिल्या सामन्यात मलेशियाचा सामना होणार होता, मात्र पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि आयसीसी क्रमवारीच्या आधारे या संघाला उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाला.

यानंतर उपांत्य फेरीत त्याचा सामना बांगलादेशशी झाला, जिथे भारताने आठ गडी राखून पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. यानंतर आता अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. यासह आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे आणखी एक पदक निश्चित झाले आहे. टीम इंडिया जिंकली तर सुवर्णपदक मिळेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply