पुणे रेल्वे स्थानक परिसरातील चार्जिंग स्थानक कार्यान्वित

पीएमपीच्या पुणे रेल्वे स्थानक आगारात उभारण्यात आलेले चार्जिंग स्थानक कार्यान्वित करण्यात आले आहे. सध्या या स्थानकातून चाळीस गाड्यांचे चार्जिंग केले जाणार असून शुक्रवारपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली.

शहराच्या चारही बाजूंना चार्जिग स्थानके तयार करण्याचे धोरण महापालिका आणि पीएमपी प्रशासनाने स्वीकारले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बाणेर येथील चार्जिंग स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. वाघोली येथील चार्जिंग स्थानकाचाही वापर सुरू झाला आहे. त्यातच आत पुणे रेल्वे स्थानक परिसरातील सुविधा शुक्रवारपासून कार्यान्वित करण्यात आली.

पुणे रेल्वे स्थानक येथील चार्जिंग केंद्रात एकूण ५ हजार ७०० किलोवऍट क्षमतेची सुविधा प्रस्तावित आहे. त्यापैकी सध्या १ हजार ५०० किलोवॅट क्षमतेची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे चाळीस गाड्यांचे चार्जिंग होऊ शकणार आहे. वाघोली येथील चार्जिंग केंद्राची क्षमता ६ हजार २०० किलोवॅट एवढी असून सध्या तेथे पन्नास गाड्यांचे चार्जिग होत आहे. वाघोली येथील केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर तेथे १०५ गाड्यांचे चार्जिंग होऊ शकणार आहे. बाणेर येथील केंद्रात ४ हजार ५०० किलोवँट क्षमतेची सुविधा असून तूर्त ३५ गाड्यांचे चार्जिंग होत आहे. ही क्षमता ७० गाड्यांपर्यंत वाढविण्यात येणार आहे. तर बिबवेवाडी येथील स्थानाकाची क्षमता ४ हजार किलोवँट असून येथे ६० गाड्यांचे चार्जिंग होऊ शकणार आहे.

पीएमपीने ताफ्यातील डिझेलवरील गाड्या बंद केल्या असून त्याएवजी पर्यावरणपूरक वीजेवर धावणाऱ्या गाड्या (इलेक्ट्रिकल बस- ई-बस) संचलनात आणण्यात येत आहेत. या प्रकारच्या गाड्यांची संख्या वाढत असली तरी गाड्यांसाठी आवश्यक चार्जिंगची सुविधा कमी आहे. त्यामुळे गाड्यांचा वापर करण्यावरही मर्यादा येत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply