Hardik Pandya : कर्णधार पांड्यावर लागणार बंदी; BCCI ने हार्दिकसह संपूर्ण मुंबई संघांवर घेतली मोठी ॲक्शन

Hardik Pandya Fined For Slow Over Rate : आयपीएल 2024 मधील 48 वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. आणि लखनौने हा सामना 4 विकेटने जिंकला.

या सामन्यातील पराभवानंतर मुंबई इंडियन्सच्या अडचणी वाढल्या आहेत. या संघाला आता प्ले ऑफमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. सामना गमावल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्यासह मुंबई संघांवर बीसीसीआयने मोठी ॲक्शन घेतली आहे. आणि आता पांड्यावर एका सामन्यावर बंदी घातली जाण्याचा धोका आहे.

बीसीसीआयने हार्दिकला दंड ठोठावला

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघ 20 षटकात 7 गडी गमावून 144 धावाच करू शकला. त्यानंतर लखनौने हे सोपे लक्ष्य 19.2 षटकांत 6 गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला होता. यानंतर बीसीसीआयने संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याला 24 लाखांचा दंड ठोठावला आहे.

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

याआधी एकदा मुंबईचा संघ स्लो ओव्हर रेटसाठी दोषी आढळला होता. आता दुसऱ्यांदा हार्दिकला दंड ठोठावण्यात आला आहे. मुंबई पुन्हा तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास कर्णधार हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते.

लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध स्लो ओव्हर रेटसाठी मुंबई इंडियन्स दोषी आढळल्यानंतर केवळ हार्दिक पांड्याच नाही तर संपूर्ण संघातील खेळाडूंना शिक्षा झाली आहे. हार्दिक व्यतिरिक्त संघातील इतर खेळाडूंना 25-25 टक्के मॅच फीचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. त्यामुळे संघाचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित होत आहेत. या हंगामात आतापर्यंत मुंबई संघाने 10 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने 7 हरले असून 3 सामने जिंकले आहेत. आता मुंबईला प्लेऑफमध्ये स्थान मिळवणे खूप कठीण जाणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply