Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची कॅनडात गोळ्या झाडून हत्या

Hardeep Singh Nijjar : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची कॅनडात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कॅनडातील सरे येथील गुरु नानक सिंग गुरुद्वाराबाहेर त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या टार्गेट शुटिंगमध्ये खलिस्तानी समर्थक निज्जरला अनेक गोळ्या लागल्या, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी निज्जर यांची गोळ्या झाडून हत्या केल्या माहिती समोर आली आहे. 

भारतीय एजन्सीच्या मोस्ट वॉन्टेड यादीत हरदीपसिंग निज्जरचा समावेश होता. भारतातील हिंसाचार आणि गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचे नाव पुढे आले होते, त्यानंतर त्याला वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत टाकण्यात आले होते.

निज्जरवर 10 लाखांचे बक्षीस होते

निज्जरचे नाव भारत सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत होते. या यादीत अन्य 40 दहशतवाद्यांचेही नाव होते. निज्जरवर गेल्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये पंजाबमधील जालंधर येथे एका हिंदू पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप होता. या हत्याकांडानंतर त्याच्यावर १० लाखांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. खलिस्तान टायगर फोर्सने (KTF) हे संपूर्ण हत्याकांड घडवून आणले. निज्जर हे या संस्थेचा प्रमुख होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply