Pune : ससाणेनगर कालव्यावरील पूल तीन महिने रखडला; धोकादायक प्रवासामुळे नागरिकांचे हाल, संताप वाढला

Pune :  ससाणेनगर रस्त्याच्या नव्या कालव्यावरील पूल धोकादायक झाल्याचे उघड होवून तीन महिने उलटून गेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने पुलावरील काही भागावर पत्रे लावून वाहतूक एकेरी केली आहे. मात्र, पुलाच्या दुरूस्तीच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नसल्याने प्रवाशांना धोकादायकपणे प्रवास करावा लागण्यासह वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे. येथील नव्या मुठा कालव्यावरील पुलाचा एक खांब ढासळला आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीला धोकादायक झाला आहे. हा धोका लक्षात घेवून पालिकेने तकलादू झालेल्या खांबावरील रस्त्याच्या भागात पत्रे लावून रस्त्यावरील भागात वाहतुकीला वळण दिले आहे.

असे असले तरी रात्री-अपरात्री वाहन धडकून थेट कालव्यात कोसळण्याचा धोका येथे निर्माण झाला आहे. मागील तीन-चार महिन्यांपासून ही परिस्थिती येथे आहे. पालिका प्रशासनाकडून याची दुरुस्ती कधी होणार, असा सवाल प्रवाशांकडून सध्या केला जात आहे. ससाणेनगर, काळेबोराटेनगर, ससाणेवस्ती, चिंतामणीनगर व सातवनगर, सय्यदनगर, हांडेवाडी, होळकरवाडी, महंमदवाडी, उंड्री पिसोळी आदी भागातील नागरिकांकडून या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. विकास आराखड्यातील डीपी रस्ते रखडल्याने व जवळचा पर्यायी मार्ग नसल्याने प्रवाशांना येथूनच धोकादायक प्रवास करावा लागत आहे. पालिकेने विशेष बाब म्हणून तातडीने या पुलाचे काम करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Nashik : सामूहिक आत्महत्याने नाशिक हादरले, एकाच कुटुंबातील चौघांनी आयुष्य संपवले

कमकुवत झालेला हा पूल १९६२ साली बांधण्यात आला आहे. त्याच्या शेजारी सिमेंटचा पिलर आहे, मात्र दगडी खांबाचे एक एक दगड बाहेर पडू लागले आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता त्यामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

"स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हा पूल धोकादायक झाल्याचे दिसून आले आहे. तज्ञ एजन्सीकडून त्याच्या दुरूस्तीचा आराखडा तयार केला आहे. त्यासाठी सुमारे एक कोटी ६८ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. जाहिरात देवून निविदा मागविण्यात येतील. त्यानंतर खर्चाला मंजूरी घेवून व पाटबंधारे विभागाचे शेड्युल घेवून महिनाभरात काम सुरू केले जाईल. पर्यायी मार्ग व वाहतुकीचेही नियोजन करावे लागणार आहे.'



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *