Pune : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी हडपसर –जोधपूर एक्स्प्रेस विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवलाय. तसेच त्यांनी एमजीआर-चेन्नई सेंट्रल–जोधपूर (भगत की कोठी) एक्स्प्रेस विशेष ट्रेनलाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे रेल्वे स्टेशनमधून हिरवा झेंडा दाखवला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी आणि आमदार सुनील कांबळे उपस्थित होते.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या समारंभात सामील झाले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्म वीर मीणा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. तसेच त्यांनी या नवीन रेल्वे सेवांबद्दल माहिती दिली.
HSC Result 2025 : मोठी बातमी! बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, कुठे आणि कसा चेक कराल रिझल्ट? |
नवीन गाड्यांचे फायदे:
१. महाराष्ट्र/तामिळनाडू आणि राजस्थान दरम्यान थेट प्रवास
२. व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात वाढ, पर्यटन सुलभ होईल.
३. प्रदेशांमधील व्यापार आणि व्यावसायिक संपर्काला प्रोत्साहन मिळेल.
४. प्रवाशांचा, विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा वेळ आणि त्रास वाचेल.
५. सांस्कृतिक संबंधांना चालना मिळेल आणि प्रादेशिक एकात्मता वाढेल.
विशेष ट्रेनचे वेळापत्रक
हडपसर (पुणे) - जोधपूर एक्सप्रेस पुणे येथून दिनांक ०३.०५.२०२५ रोजी १७:३० वाजता सुटेल आणि जोधपूर येथे दुसऱ्या दिवशी १४:०० वाजता पोहोचेल.
हडपसर आणि जोधपूर दरम्यानच्या नियमित रेल्वे सेवांची माहिती
हडपसर - जोधपूर एक्सप्रेस दिनांक ६.५.२०२५ पासून हडपसर येथून दररोज १९.१५ वाजता सुटेल आणि जोधपूर येथे दुसऱ्या दिवशी १५:१० वाजता पोहोचेल.
जोधपूर - हडपसर एक्सप्रेस दिनांक ५.०५.२०२५ पासून जोधपूर येथून दररोज २२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७:१० वाजता हडपसर येथे पोहोचेल.
नियमित गाड्यांचे थांबे: पुणे, चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, सुरत, वडोदरा, गेरतपूर, अहमदाबाद, महेसाणा, पालनपुर, आबू रोड, पिण्डवाड़ा, जवाई बॉंध, फालना, राणी, मारवाड जंक्शन, पाली मारवाड़ आणि लूनी.
नियमित गाडीमधील संरचना : दोन द्वितीय वातानुकूलित, तीन तृतीय वातानुकूलित, २ तृतीय इकॉनॉमी वातानुकूलित, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनररेटर व्हॅन.
शहर
महाराष्ट्र
- Shahapur : आमदार- खासदार विरोधात आक्रोश; ग्रामसभेत ग्रामस्थांनी दर्शविली नाराजी
- Vaishnavi Hagawane : क्रूर हगवणेंना शस्त्रपरवाना कुणी दिला? जालिंदर सुपेकरांचे स्पष्टीकरण; नावही समोर आलं
- Ladki Bahin Yojana : २६५२ सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडक्या बहिणीचे पैसे; सरकार करणार कारवाई
- Crime News : तिकीट एजंट बनला विदेशी स्कॉचचा तस्कर; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, तिघेजण ताब्यात
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण
- Monsoon Update : पुढच्या २४ तासांत मान्सून केरळमध्ये; महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अलर्ट